पिंपळगाव शेतशिवारात फूड स्प्रे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन
विशेष प्रतिनिधी
मयुर अवसरे
स्पेक्ट्रम कॉटफायबर एल एल पी व अग्री एक्सटेन्शन या माध्यमातून सुरू असलेल्या उत्तम कापूस निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कळंब तालुक्यातील पिंपळगाव रुई येथील शेतकरी तुकाराम भुजबळ यांच्या शेतात फूड स्प्रे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बीसीआय स्पेक्ट्रम विषयी माहिती बी सि आय च्या या सात तत्त्वांवर माहिती देण्यात आली तसेच फूड स्प्रे तयार करण्याची प्रक्रिया व त्यापासून होणारे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले सदर फुड प्रे पाच किलो मका एक किलो साखर पन्नास ग्राम डिटर्जंट साबण यापासून तयार करण्यात आला फूड स्प्रे चे फायदे मित्र किडीचे संवर्धन बाबत माहिती देण्यात आली सोबतच पी पी ई किट चे महत्व चे महत्व वतेच व त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले- सदर प्रशिक्षणाकरिता गावातील सरपंच श्री मनोज रुईकर पोलीस पाटील श्री उमेश लोखंडे तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र घोडे प्रतिष्ठित नागरिक देविदास घोडे या बहुसंख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते सदर कार्यक्रमाकरिता पियू व्यवस्थापक संजय आंबटकर यांनी मार्गदर्शन केले तसेच फिल्ड फॅसिलिटर म्हणून संदीप जगताप अमोल बारी नागसेन सुटे लक्ष्मण येडसकर हितेश भोयर वैभव इजपाडे सागर शुक्ला आनंद मांढरे वैभव मेघळ प्रियंका ओंकार उपस्थित होती