पोलीस प्रशासनाचा नवा पायंडा...
फुले हार गुच्छे आणु नये
तुम्ही भेटीला येत आहे तर फक्त पुस्तके आणा...
पोलीस अधिक्षक कार्यालयाचे नागरीकांना आवाहन.
वर्धा:
एरवी नवे अधिकारी आले की सामाजिक कार्यकर्ते, व अनेक संस्था शहरातील समस्या घेऊन अधिकाऱ्यांना जाऊन भेटतात. फुलं, हार ,गुच्छे, मिठाई यासारखे शुभेच्छा देताना साहित्य सोबत नेत असतात. अधिकारी सुद्धा मोठ्या उत्साहाने त्यांचा स्वीकार करतात. नागरिकांची ओळख करून घेणे. आणि जिल्ह्यातील समस्या समजून घेणे हा त्यामागचा उद्देश असतो.
परंतु यावेळेस मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयातून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
ज्या व्यक्तींना नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक नुरून हसन यांनी भेटायला येणाऱ्यांसाठी पोलीस अधीक्षक गृह कार्यालयाने सुचना केलेल्या आहे.
पोलीस अधीक्षकांना भेटायला यायचे आहे त्यांनी मिठाई, हार ,गुच्छे सोबत घेऊन येण्यापेक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, निरीक्षक, उपनिरीक्षक , ग्रामसेवक, तलाठी या प्रकारच्या प्रशासकीय सेवेतील परीक्षांसाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमातील पुस्तकांची नवीन आवृत्ती घेऊन यावे. या पुस्तकांचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांना होईल यासाठी पोलीस विभागामार्फत आवाहन केले आहे.
तेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जात आहात का? मग सोबत दिलेल्या परिपत्रकाचे एकदा वाचन करा आणि या पुस्तकांची खरेदी करा व नंतरच कार्यालयात जा.