पुलगाव येथे ठाणेदार शैलेश शेळके यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय नेते एकवटले, ठाणेदारांचे कार्य उत्तम असल्याबाबत दिले उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन.

पुलगाव येथे ठाणेदार शैलेश शेळके यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय नेते एकवटले, ठाणेदारांचे कार्य उत्तम असल्याबाबत दिले उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन.
   वर्धा:
    आज 24 नोव्हेंबर रोजी पूलगावातील सर्वपक्षीय पदाधिकारी ठाणेदार शैलेश शेळके यांच्या समर्थनार्थ एकवटले असून ठाणेदार शैलेश शेळके यांचे कार्य उत्तम आहे. अवैध धंद्यावाल्यांना लगाम उत्तम प्रकारे त्यांनी लावला आहे. पुलगाव शहरात जेव्हापासून आपल्या कर्तव्यावर शैलेश शेळके हे आले तेव्हापासून शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अशा कर्तव्यदक्ष ठाणेदार विषयी काही लोक उपद्रव करत आहे. ज्यांची पार्श्वभूमी ही अवैध धंदे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे त्यांना कर्तव्यदक्ष ठाणेदार शेळके हे जड होत असल्याने ठाणेदाराविरुद्ध खोटे कटकास्थान समाजकंटक करत आहे. अवैध धंदेवाल्यांची नाळ आवरल्यामुळे समाजकंटक पुलगाव शहरातील नागरिकांमध्ये जातीय तेढ निर्माण करत आहे, असे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
        ठाणेदार शैलेश शेळके यांची पुलगाव शहराला गरज आहे अशा शिस्तबद्ध अधिकाऱ्यावर अन्याय होता कामा नये, जर अशा शिस्तबद्ध अधिकाऱ्यांवर अन्याय झाला तर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व्यापारी तसेच महिला आघाडी तीव्र आंदोलन करेल असे उपविभागीय कार्यालय पुलगाव येथे निवेदन सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आले. यावेळेस मोठ्या संख्येने सर्वच पक्षातले पदाधिकारी उपस्थित होते.
public voice news
public voice news