रोहिणी वसु येथे पंचायत समिती सदस्य स्वप्निल खडसे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वाटप
देवळी:
महाराष्ट्र सरकारकडून गोरगरीब जनतेची दिवाळी उत्तमपणे साजरी झाली पाहिजे याकरिता अवघ्या शंभर रुपयात चार साहित्यांचे स्वस्त धान्य दुकानातून वाटप सुरू असून आज 24 ऑक्टोंबर रोजी देवळी तालुक्यातील रोहिणी वसु या गावांमध्ये आनंदाच्या शिधा किटचे वाटप पंचायत समितीचे माजी सदस्य स्वप्निल भाऊ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले
स्वस्त धान्य दुकानातून दिवाळी किटचे वाटप करताना नागरिकांना पंचायत समिती सदस्य स्वप्निल खडसे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव शेलत माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशराव लंगोटे गावातील प्रतिष्ठित नागरिक संजय भाऊ शहाडे व मिथुन कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती