वर्ध्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नुरुल हसन रूजू, अवैध व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाई होणार

वर्ध्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नुरुल हसन रूजू; सर्वसामान्यांना न्याय देणार, हसन यांची ग्वाही.
अवैध व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाई होणार ;पोलीस अधीक्षक नुरुल हसन
वर्धा:
   
 वर्ध्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नुरुल हसन रूजू झाले आहे. ते यापूर्वी नागपूर येथे झोन चारला डीसीपी म्हणून कार्यरत होते. पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकांना न्याय मिळावा, यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करणार असल्याचं नुरुल हसन यांनी सांगितलं.
     
कायद्याच्या चौकटीत न्याय देण्याचा प्रयत्न राहील. सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येईल. गुन्हेगारी नियंत्रणासाठी नियमानुसार कारवाई केली जाईल.अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स आहे. अवैध धंदे नियंत्रीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.अवैध व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाई करू,असं पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितलं.
      न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी माझे दार सदैव उघडे आहेत. ही खूर्ची कोणतीही व्यक्ती, जात, धर्म आणि राजकीय पुढाऱ्यांशी कधीही ‘मॅनेज’ होणार नाही. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने मला सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव आहे. मला नागरिकांचा सेवक बनून काम करायचे आहे असे त्यांनी बोलून दाखवले.
       नागरिकांची सुरक्षा करणे आणि शांतता व सुव्यवस्था राखणे, हाच माझा एकमेव उद्देश आहे.असही नुरुल हसन म्हणाले.मी शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतो, हे मला ठाऊक आहे. पण, काम करत असताना मी देखील तुमच्यातलाच एक आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये निमार्ण करण्याचा प्रयत्न आहे.
       ज्याच्यासोबत कुणी नाही त्याच्या पाठिशी एसपी उभा आहे, न्यायपूर्ण कारवाई करताना कोणत्याही दबावाखाली काम करणार नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
public voice news
public voice news