राष्ट्रसंतांच्या विचारांचा अवलंब करून गावाचा विकास करा; डॉ.अनिल ओंकार

राष्ट्रसंतांच्या विचारांचा अवलंब करून गावाचा विकास करा; डॉ.अनिल ओंकार
देवळी:
        राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा जागर करून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात इंझाळा गावातील पहिले अभियंता म्हणून मोठ्या पदावर गेलेले तसेच पीएचडी प्राप्त डॉ. अनिल ओंकार यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा अवलंब करून गावांचा विकास करा प्रतिपादन केले.
      देवळी तालुक्यातील इंझाळा या गावामध्ये हनुमान मंदिर सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा जागर करून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.
      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी असून सध्याच्या विखुरलेल्या मानव जातीला एकत्र करण्यासाठी तसेच युवा पिढीला प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त आहे. असे मत मांडून डॉ. अनिल ओंकार यांनी सविस्तर मार्गदर्शन गावकऱ्यांना केले. त्याचबरोबर संदीपभाऊ घुरडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. 
     सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व तसेच राष्ट्रसंतांच्या विचारावर आपण का चालावे याबाबत उपस्थित त्यांना प्रशांत दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. दुपारपासूनच भजन मंडळींनी सभागृहामध्ये भजन संमेलन आयोजित केले होते.
     गावांमधील अनेक मान्यवरांचा सत्कार सुद्धा या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सरपंच संजय ढुमणे, डॉ. अनिल ओंकार, प्रशांत दुर्गे, चिंतामणराव मोने, भगवानजी पोलकडे यांच्यासह अनेक गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला युवक यांची प्रामुख्याने उपस्थिती पाहायला मिळाली.
public voice news
public voice news