भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन राऊत यांची नियुक्ती
वर्धा:
देवळी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात असलेल्या गजानन निळकंठराव राऊत यांची आज 31 ऑक्टोबर रोजी भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
आज वर्धा येथे पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आढावा बैठकीत भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट जयंत भाऊ कावळे अविनाश देव यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
देवळी तालुक्यातील इंझाळा जिल्हा परिषद सर्कलचे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून गजानन राऊत यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी सुनीता गजानन राऊत ह्या इंझाळा जिल्हा परिषद सर्कलच्या विद्यमान सदस्य होत्या.
भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन राऊत यांची नियुक्ती झाल्याने सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष वाढीसाठी काम करणार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार असे गजानन राऊत यांनी बोलून दाखविले.