महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची संयुक्त कार्यवाही
अमरावती प्रतिनिधी :
दि.१७/१०/२०२२ व दि.१८/१०/२०२२ रोजी मध्य झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या ऑटो गल्ली, जवाहर रोड व उत्तर झोन क्रं.१ अंतर्गत येणार ट्रान्सपोर्ट एरिया, जुना कॉटन मार्केट परिसरात अमरावती महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त प्लास्टिक जप्ती मोहिम राबविण्यात आली असून आस्थापनाधारक, किरकोळ विक्रेता यांची तपासणी केली असता तपासणी दरम्यान ५ आस्थापने सजीली ब्युटी सेंटर, चामुंडा मोबाईल, गणेश मोबाईल, पराग मोरवाणी, राधिका तंबाकू यांना प्रतिबंदात्मक प्लास्टिक कॅरिबग, नॉन ओव्हन बॅग वापर करत असल्याचे आढळून आल्याने प्रति आस्थापने ५०००/- रुपये प्रमाणे २५,०००/- रुपये इतका दंड वसुल करण्यात आला. तसेच २ किंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले.
सदर मोहीमेमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी श्रीमती धनश्री पाटील, क्षेत्र अधिकारी श्री जितेंद्र पुरते, क्षेत्र अधिकारी श्री.सुरेंद्र कारणकर, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक विकी जेधे, धनिराम कलोसे, मनीष हडाले, महेश पळसकर, पंकज तट्टे, योगेश कंडारे, वैभव खरड, अजिंक्य जवंजाळ उपस्थित होते.