आगरगाव येथील भवानी माता मंदिरात दीपोत्सव साजरा
आई भवानीची चरणी आणि शिवशंभु चरणी दिवाळीचा पहिला दिवा लावण्यासाठी
दीप उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
ज्याच्यामुळे आज आपण दिवाळी साजरी करत आहात ज्यांच्यामुळे आज देवळात देव आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना दिवाळीचा पहिला दिवा या निमित्ताने दीप उत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावातील जेष्ठ नागरिक उमेशराव इंगोले नितीनराव महल्ले माधवराव सावंत चेतन धोपटे गौरव ठाकरे हे मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी दीप प्रज्वलित करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले चेतन धोपटे दीपोत्सवाबद्दल आणि शिवशंभू महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन सौरभ हांडे शंतनू माटे हर्षल उईके यांनी केले व कार्यक्रमाला प्रफुल कांबळे अभिषेक पठाडे संकेत जौंजाळ वेदांत जौंजाळ. आर्यन राऊत अथर्व राऊत शाश्वत भोगे हर्षल राऊत मयूर बावणे प्रज्वल राऊत संकेत हांडे हे सर्व शिवभक्त उपस्थित होते.