विविध राज्यातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत संताजी जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात साजरी.
*युवा संघर्ष मोर्चाच्या पुढाकाराने आयोजन.
देवळी:
स्थानिक आठवडी बाजार चौक स्थित युवा संघर्ष मोर्चाचे कार्यालयात दि. ८ रोज गुरुवारला सकाळी ठिक १० वा. जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे प्राणप्रिय शिष्य संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सेवाग्राम आश्रम येथे नेतृत्व संगम या प्रशिक्षनाकरिता देशभरातील १४ राज्यातून आलेले २० मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम किरण ठाकरे व अन्य प्रमुख पाहुण्यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण करण्यात आले.
मान्यवरांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी किरण ठाकरे यांनी बोलतांना सांगितले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील अनेक थोर संतांच्या विचारांमुळे अनिष्ट रूढी परंपरा संपुष्टात आल्या व जाती,धर्मातील भेद मिटविण्याचे काम संतांच्या विचाराने केले. संत हे कुण्या एकट्या व्यक्ती,जात,धर्म,प्रांता पुरते मर्यादित नसून सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म झाल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे देशभरातील विविध राज्यातून आलेल्या लोकांपर्यंत संताजी जगनाडे महाराजांचे विचार पोहचावे या उद्देशाने त्या मान्यवरांच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराजांची जयंती युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी त्यापैकी बऱ्याच मान्यवरांना मराठी व हिंदी या दोन्ही भाषा अवगत नसल्यामुळे त्यांना संत जगनाडे महाराजां विषयी हिंदी मध्ये देण्यात आलेल्या भाषणाचा अनुवाद मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी हिंदीचे इंग्रजी मध्ये भाषांतर करून सांगितले. यावेळी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, पॉडिंचेरी, केरळ, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड,ओडिसा,झारखंड या राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी संत जगनाडे महाराजांचे जीवन चरित्र ऐकून महाराजांचे विचार आमच्या पुढील जीवनात निश्चितच उपयोगी पडणार असल्याचे मत व्यक्त केले.
सोबतच संत तुकाराम महाराज व संत जगनाडे महाराजांचा जयघोष करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे, प्रवीण कात्रे,गौतम पोपटकर,नितीन सायंकार, पंकज कारोटकर, गौरव खोपाळ, भूषण कडू, राम अंभूरे, दादाराव मुन, आशिष भोकरे, मोहन ठाकरे, अजय देशमुख, दिनेश शिदोडकर, नदीम शेख, नरेश आदमने, प्रवीण तराळे,अमोल झाडे,मनीष आदमने,सतीश राऊत, प्रफुल कुक्कडे व विविध राज्यातून आलेले बलराम(राजस्थान),निर्मल(हरियाणा),अभिनव(उत्तरप्रदेश), शफी आलम(बिहार), कृतिका(तामिळनाडू), गणेश साहू(ओडिसा),लावण्या(कर्नाटक), अर्जुन(केरळ),महेंद्रा(तामिळनाडू), त्रिभुवन सिंग(छत्तीसगड), गुलखान(छत्तीसगड), बी. सुभाष(केरळ), सुमेध गायकवाड(ठाणे,महाराष्ट्र), अमुक प्रियदर्शि( झारखंड), अमुदर्शन( पॉंडीचेरी),अवनिष भायक(मध्यप्रदेश) व अन्य मान्यवरांची,पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.