विजयगोपाल येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथे 31 डिसेंबर रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये गायक सुनील कांबळे व त्यांच्या संचांनी उत्तम अशा भिम बुद्ध गीतांचा नजराणा प्रेक्षकांसमोर सादर केला. कामगार नेते तुषारभाऊ उमाळे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला.
हा कार्यक्रम लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आज सायंकाळी घेण्यात आला. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावातील नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली.