डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गणेश शेंडे सन्मानित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गणेश शेंडे सन्मानित
वर्धा:
    देवळी येथिल पत्रकार गणेश शेंडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार    पुरस्कार  देऊन मदत सामाजिक संस्था नागपूर येथे 20 व्या राज्यस्तरीय  कार्यकर्ता संमेलन पुरस्कार सोहळा कार्यक्रमात. नागपूर येथे  सन्मानित करण्यात आले.
     नागपूर येथील श्री गुरुदेव आश्रम सभागृह येथे कार्यक्रम घेण्यात आला होता, या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ. प्रकाश सोनवणे दिनेश वाघमारे यांनी केले होते.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जोग्रेद्र कवाडे सर  लाँगमार्च नेते प्रमुख पाहुणे म्हणून रमेश लोखंडे उद्योजक सामाजिक कार्यकर्ता इंजिनीयर रूपराज गौरी, ईश्वर मेश्राम अध्यक्ष नागपूर मनपा कर्मचारी बँक माजी नगरसेवक मनोज गावंडे, मनोज सावळे, सुभाष भोयर, राहुल मून, संयोजक संविधान परिवार संजय कडोळे अध्यक्ष विदर्भ लोक कलावंत संघटना कारंजा अँड  अशोक यावले जेटी लोणारे   आदिची  प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी  माजी. खा. प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ  प्रमाणपत्र  व   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान पुस्तक देऊन  गणेश शेंडे पत्रकार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र दलित तरुण संघटना नागपूर  च्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले समाजवैभव सन्मान महालक्ष्मी बहुउदेशीय सामाजीक शैक्षणिक व  सामाजिक संस्था देवळी च्या वतीने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह कॉटन सिटी फोटोग्राफर क्लब यवतमाळ च्या वतीने तिसरी छायचित्र स्पर्धा व प्रदर्शनी  जागतिक छायाचित्र दिना निमित्त प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
public voice news
public voice news