पुलगाव येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने निघाली भव्य शोभायात्रा

पुलगाव येथे बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने निघाली भव्य शोभायात्रा
पुलगाव
    देवळी तालुक्यातील पुलगाव येथे आज बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 918 व्या जयंतीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा निघाली. जगत ज्योती बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
      पूलगाव शहरातील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये बसवेश्वरांच्या प्रतिमेला माल्यारपन करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. तसेच सायंकाळी आदर्श जवळून भव्य अशी शोभायात्रा निघाली या शोभायात्रेमध्ये वीरशैव लिंगायत समाज बांधव तसेच महिला मंडळाची प्रामुख्याने उपस्थिती दिसून आली. महात्मा बसवेश्वर यांच्या रथासह या शोभायात्रेमध्ये अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या झ्याक्या पुलगावकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते. तसेच अनेक भजनी मंडळ ढोल ताशाच्या पथकासह महात्मा बसवेश्वरांच्या वेशभूषेत घोड्या वर साक्षात बसवेश्वरांची प्रतिकृती व नयनलोचक लाइटिंग सर्वांचे नेत्रदीप टिपत होती. ओम नमः शिवाय चा नारा देत महात्मा बसवेश्वरांचा जयजयकार करीत पुलगावातील मुख्य मार्गाने ही शोभायात्रा मार्ग क्रमन करीत महात्मा बसवेश्वर चौकामध्ये आल्यावर महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान करणारे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संतोष आप्पा गाजले यांनी समाज प्रबोधन केले. महात्मा बसवेश्वरांचे विचार आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेशजी सावरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश शहागडकर मनीष साहू संजय गाते ठाणेदार शैलेश शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी समाजातील मान्यवरांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
 तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून पहिले व पारितोषिक मिळवणारी अक्षरा तूपकरी तिला सन्मानित करण्यात आले.
   महिला मंडळांनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन पंकज गादगे यांनी केले. तर प्रास्ताविक बापूसाहेब टाले यांनी केले आभार प्रदर्शन बाळाभाऊ शहागडकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे सचिव हेमंत तुपकरी, नितेश लोखंडे, राजूभाऊ महाजन, आकाश वाघमारे, राकेश काचेवार, किरण पखाले, किरण मलमकार, पप्पू पालखंडवार, शुभम डाळिंबकर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पुलगावकरांसह वीरशैव लिंगायत समाजाच्या युवक युवती महिला पुरुषांची उपस्थिती प्रामुख्याने पाहायला मिळाली.
public voice news
public voice news