दिवाळीला सोने खरेदीसाठी नागरिकांची पसंती..
वर्धा: सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा देशांमध्ये जुनीच आहे सोन्यात केलेली गुंतवणूक ही हमखास मानली जाते ही कधीही वाया जात नाही. अडचणीच्या काळात आपल्याला प्रचंड उपयोगी ठरणारी वस्तू म्हणजे सोने परंतु सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहे तरीसुद्धा दिवाळीच्या निमित्याने सोने खरेदी कडे नागरिकांचा कॉल दिसून येत आहे. सोनाराच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे बहुतेक लोकांकडून सोन्याच्या खरेदीसाठी पसंती दिल्याचे चित्र आहे.
सोन्याच्या किमती गेल्या वर्षभरात 20 टक्क्यांनी वाढले आहे सोन्याची किंमत मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याचे सराफा व्यापार्याकडून सांगितले जात आहे