महसूलमंत्र्यांच्या हस्ते वर्ग-3 कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन सीआर प्रणालीचे उद्घाटन

महसूलमंत्र्यांच्या हस्ते वर्ग-3 कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन सीआर प्रणालीचे उद्घाटन

* जिल्हाधिकारी कार्यालयाचा नाविण्यपूर्ण उपक्रम

* वर्ग-3 कर्मचाऱ्यांना सुलभ उपलब्ध होणार सीआर

वर्धा : शासकीय सेवेमध्ये काम करित असतांना कार्यमुल्यमापन अहवालास (सीआर) अनन्यसाधारण महत्व आहे. आतापर्यंत वर्ग-3 कर्मचाऱ्यांचे  सीआर ऑफलाईन पध्दतीने सादर करण्यात येत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून वर्ग-3 कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सीआर भरण्याची प्रणाली सुरू केली. या प्रणालीचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते झाले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उद्घाटन कार्यक्रमास आ.समिर कुणावार, आ.राजेश बकाने, आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह सर्व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी ऑनलाइन सीआर प्रणालीचे कौतुक केले. राज्यात व इतर विभागांमध्ये सुध्दा ऑनलाइन सीआर प्रणालीचा वापर केल्यास वर्ग-3 कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदोन्नती देतांना याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.


ऑनलाइन सीआर पध्दतीचे फायदे

सीआर प्रक्रिया ऑफलाईन असल्यामुळे मुळ दस्ताऐवज गहाळ, गोपनियतेचा भंग होण्याची शक्यता होती, आता त्याला आळा बसणार आहे. ऑनलाईन प्रणाली विकसित झाल्यामुळे वाहतुकीदरम्यान कागदपत्रे हरविणे किंवा चोरीस जाण्याची शक्यता नाही. ऑनलाईन प्रक्रियेमुळे सीआरच्या स्थितीचा मागोवा घेता येईल. संपूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे केव्हाही व कुठेही प्रवेश सीआर पाहता येईल. ऑनलाइन प्रक्रियेमुळे पारदर्शकता येईल व कर्मचाऱ्यांना वेळत सीआर उपलब्ध होईल. तसेच कर्मचाऱ्यांना ई-मेल व एसएमसएसद्विरे सूचना मिळणार आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे सीआरवर पुनर्विलोकन अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्याबरोबर कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर सीआर मिळणार आहे.


public voice news
public voice news