आमदार राजेश बकाने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
देवळी–पुलगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार राजेश बकाने यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने देवळी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मतदारसंघातील मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे ३,००० पदांची सरळ भरती केली जाणार आहे.
तसेच पुलगाव येथे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विशेष आकर्षण लाभले आहे. या कार्यक्रमास भाजपा नेते नितेश राणे, पालकमंत्री पंकज भोयर, जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर व इतर सिने कलाकारांची उपस्थिती राहणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीसाठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदार राजेश बकाने यांच्यावर वाढदिवसानिमित्त सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षव केला जात आहे.